२२ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ नंतर पार पडलेल्या दुर्ग बांधणी स्पर्धेच्या परीक्षणामध्ये शिवकालीन युद्धकला, स्वराज्यभावना आणि इतिहासाचा अप्रतिम अनुभव सर्वांना मिळाला.
या स्पर्धेत लहान मुलांपासून तरुण, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. कुणी साहित्य गोळा केले, कुणी रचना आखली तर कुणी शिवकालीन माहिती शोधून तिच्या आधारे प्रकृती सजवली, त्यामुळे हा उपक्रम एका पिढीपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाला जोडणारा सांस्कृतिक वारसा ठरला.
नैसर्गिक साहित्य, प्रकाशयोजना आणि कल्पनाशक्तीच्या सुंदर एकत्रिकरणामुळे तयार झालेल्या प्रत्येक दुर्गाच्या प्रकृती प्रभावी आणि आकर्षक दिसत होत्या. परीक्षक आणि पाहुण्यांनी प्रत्येक प्रकृतीभोवती फिरत त्यातील तपशील, रचना आणि ऐतिहासिक संदर्भ आत्मीयतेने अनुभवले.
या स्पर्धेचे परीक्षण दुर्गवीर प्रतिष्ठानचे दुर्गवीर अमित थोरात यांनी केले.
स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे:
🔸 प्रथम क्रमांक: दुर्ग अजिंक्यतारा
सादरकर्ते: मातोश्री, प्लॉट क्रमांक १११, चारकोप
🔸 द्वितीय क्रमांक: दुर्ग साल्हेर
सादरकर्ते: सोमेश्वर, प्लॉट क्रमांक २४९, चारकोप
🔸 तृतीय क्रमांक: दुर्ग विजयदुर्ग
सादरकर्ते: विश्वामित्र, प्लॉट क्रमांक १००, गोराई
🔸 उत्तेजनार्थ पुरस्कार:
- दुर्ग सुवर्णदुर्ग — सह्याद्री C-5
- दुर्ग सिंहगड — सह्याद्री C-22
- दुर्ग पुरंदर — सह्याद्री D-13
ही स्पर्धा जिंकणे हा उद्देश नव्हता तर स्वराज्याची आठवण जपणे, इतिहास पुन्हा अनुभवणे आणि पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोहचवणे हा मुख्य हेतू होता.







