व्यंगचित्र कार्यशाळा २०२५

२५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी गोराईतील सुविद्या शाळेत आयोजित विनोदी, कलात्मक आणि शिक्षणाने समृद्ध अशा व्यंगचित्र कार्यशाळेत मुलांपासून प्रौढांपर्यंत उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. प्रशांत नावकर आणि त्यांच्या टीमने सकाळी १० ते दुपारी १ आणि पुन्हा दुपारी २ ते ५ या दोन सत्रांत रेखाटनाची मूलभूत तंत्रे, निरीक्षण कौशल्य, अभिव्यक्ती आणि व्यंगचित्रातील विनोदाची ओळख सहभागींना दिली.

हसत-खेळत शिकण्याच्या या दोन दिवसांनी अनेक budding artists तयार झाले. कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले आणि अनेकांनी पहिल्यांदाच व्यंगचित्र तयार करत आपली प्रतिभा उजळवली.

Scroll to Top