स्मृतीदिन व बक्षीस वितरण सोहळा
१७ नोव्हेंबर २०२५ रोजी गोराईचा राजा क्रिडांगण येथे आयोजित स्मृतिदिन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि Multi Space Developer Pvt. Ltd. प्रायोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि सहभागी स्पर्धक व त्यांच्या कुटुंबीयांनी सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला.
टाळ्यांचा गजर, आनंद आणि भावनिक वातावरणात सोहळ्याची सांगता झाली.









