प्रतिवर्षीप्रमाणे संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
निवृत्त लष्करी अधिकारी श्री. कालेकर यांच्या हस्ते, प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. मधुकर मोरे यांच्या उपस्थितीत व विश्वस्त श्री. पद्माकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रतिष्ठानच्या हिशेब तपासनीस सौ. ज्योती भंडारी यांनी स्फूर्तीगीत सादर करून समारंभाची शोभा वाढवली.
देशभक्तीच्या भावना जागवणाऱ्या या सोहळ्यात सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन तिरंग्याला वंदन केले आणि स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांच्या त्यागाचे स्मरण केले.




