“नव वर्षाचा प्रथम दिवस रंगे, साहेब प्रतिष्ठान गोराई संगे!” या घोषवाक्याला साजेशी अशी उत्सवमय संध्याकाळ ३० मार्च २०२५ रोजी गोराईचा राजा क्रीडांगण येथे पार पडली. संपूर्ण कुटुंबांनी आनंदाने सहभागी होत पारंपरिक गुढीपाडवा साजरा केला. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमांना उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ, हलकंफुलकं मनोरंजन आणि सुंदर सजावटीने कार्यक्रमात रंगत आणली.
लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी विविध उपक्रमांत सहभाग घेतला आणि विशेष बक्षिसांची मेजवानी लुटली.
गुढी उभारणीपासून ते आकर्षक स्पर्धा, पारंपरिक पोशाख आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद – प्रत्येक क्षण आनंददायक ठरला.
साहेब प्रतिष्ठान गोराई च्या वतीने आयोजन करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांच्या मनात खास आठवण म्हणून कोरला गेला.





