सखी आनंद मेळावा २०२५ या विशेष कार्यक्रमाने ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने साजरे केले. गोराईचा राजा क्रीडांगण येथे पार पडलेल्या या सोहळ्यात कांदिवली व बोरिवली परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य, आत्मविकास व सशक्तीकरण यासारख्या विषयांवर माहितीपूर्ण व्याख्यान घेण्यात आले. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला ब्रँड गुरु जान्हवी राऊळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी या दोन कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला.
विविध बैठे खेळ, लकी ड्रॉ आणि आठवण भेटींसह साऱ्या सख्यांनी हास्य-विनोदात रंगलेली संध्याकाळ अनुभवली. साहेब प्रतिष्ठान – गोराई च्या या उपक्रमाने स्त्रीशक्तीचा सन्मान करत समाजात एक सकारात्मक संदेश दिला.







